बंधू बाष्टे यांना शुभेच्छा देताना डावीकडून सर्वश्री सुभाष थरवळ, मंदार सावंतदेसाई, विलास पाटणे व राजशेखर मलुष्टे. (छाया : मकरंद पटवर्धन ) |
रत्नागिरी येथील ज्येष्ठ मेकॅनिक आणि 'मोटार जगत'चे सन्माननीय सल्लागार (पहा- आम्ही) सुभाष श्रीराम तथा बंधू बाष्टे यांनी नुकताच आपल्या आयष्याचे अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण केले. योगायोग असा की याच महिन्यात 'सुभाष ऑटो रिपेअर्स' या त्यांच्या मोटार गॅरेजच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या अनेक हितचिंतकांनी सुभाष ऑटो रिपेअर्स येथे त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्यात सुरु झालेल्या जिल्हावार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रत्नागिरी येथील 'आयटीआय'चाही समावेश होता. तेथे सुरु झालेल्या मोटार वाहन दुरुस्ती अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीतून बंधू उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील प्रख्यात मेकॅनिक आनंद स्वादी यांच्या वर्कशॉपमध्ये उमेदवारी केली आणि १९६९ च्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून रत्नागिरी येथे स्वतः;चे गॅरेज सुरु केले. मोटारीच्या रचनेचे व दुरुस्तीचे सखोल ज्ञान, नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास, व्यावसायिक सचोटी आणि स्वागतशील स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीत नावलौकिक मिळविला. मोटारीव्यतिरिक्त इतर अनेक विषयांत असलेली गोडी, शहराच्या स्थानीय इतिहासाचे ज्ञान आणि सामाजिक वाटचालीचे सूक्ष्म निरीक्षण यामुळे बंधू विविध क्षेत्रांतील जाणकारांमध्येही लोकप्रिय झाले. त्यांची व्यावसायिक व सामाजिक योग्यता लक्षात घेऊन साप्ताहिक आरसा' आणि 'मोटार जगत'तर्फे त्यांना २००११ मध्ये 'मोटार जगत जीवन गौरव' प्रदान करण्यात आला होता.
बंधूंच्या वाढदिवसानिमित्त गॅरेजमध्ये झालेल्या अनौपचारिक आणि उत्स्फूर्त छोटेखानी मित्रमेळाव्याला वकील सर्वश्री राजशेखर मलुष्टे, विलास पाटणे, अशोक भिसे, 'मोटार जगत'चे संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य मंदार सावंतदेसाई इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. बंधूचे सुपुत्र गौतम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गॅरेजचा सुवर्णमहोत्सव आणि संस्थापकांचा अमृतमहोत्सव असा दुग्धशर्करा योग्य जुळून येणे ही बंधूंसाठीच नव्हे तर रत्नागिरीकरांसाठीही संस्मरणीय गोष्ट आहे असे श्री. मलुष्टे म्हणाले, तर बंधू हे
श्री. पाटणे यांनी सांगितले. केवळ मोटारगाडीचेच नाही तर
इतिहास आणि अन्य अनेक विषयांचे बंधू बाष्टे
जाणकार आहेत अशा शब्दांत श्री. मसुरकर यांनी
त्यांचा गौरव केला.
बंधूंना शुभेच्छा देताना राजेंद्रप्रसाद मसुरकर, उजवीकडील चित्रात प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे सुभाष श्रीराम तथा बंधू बाष्टे. (छाया : मकरंद पटवर्धन ) |