मोटारविषयक प्रशिक्षण
संपर्क : ९९६०२४५६०१
‘मोटार जगत’ हे मासिक चालविताना
मोटारविषयक माहितीबरोबरच वाहतुकीच्या सुरक्षेसंबंधी प्रबोधन कार्यक्रमात संपादक
सहभागी होऊ लागले. त्यावेळी श्रोत्यांची नेमकी गरज ध्यानात घेऊन वेगवेगळी वाहने
चालविणाऱ्या व्यक्तीकरिता वेगवेगळे सादरीकरण आवश्यक असल्याचे जाणून त्यानुसार खास
कार्यक्रम तयार केले. परवानाधारक नवख्या मोटारचालकांसाठी सराव आणि मार्गदर्शनही दिले जाते.
यातूनच मसुरकर्स अकॅडेमी ही वाहनविषयक विविध प्रकारचे प्रशिक्षण देणारी संस्था रत्नागिरी येथे स्थापन झाली. (www.masurkarsacademy.webs.com) आतापर्यंत शंभराहून अधिक ‘सुरक्षित वाहतूक प्रबोधन कार्यक्रम’
सादर करण्यात आले. हे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढील संस्थानी सहकार्य केले.·
- लायन्स क्लब, रत्नागिरी, लांजा
- गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरी
- रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी
- श्रीमान भागोजीशेठ कीर लॉ कॉलेज, रत्नागिरी
- श्रीमान गंगाधारभाऊ पटवर्धन स्कूल, रत्नागिरी
- न्यू पोलिटेक्निक, कोल्हापूर
- गुरुकुल डे स्कूल, डोंबिवली
- शासकीय मत्स्यमहाविद्यालय, रत्नागिरी
- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
- मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, रत्नागिरी
- पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी
- मुकुल माधव स्कूल, रत्नागिरी
- उद्योजक संघटना, दापोली
- नेव्हल एनसीसी युनिट, रत्नागिरी
- प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी, कुडाळ (सिंधुदुर्ग)
- पोलीस मुख्यालय, रत्नागिरी
- वाहतूक पोलीस, रत्नागिरी
- एस.टी. महामंडळ, रत्नागिरी विभाग
- श्रीराम विद्यालय (वाहन प्रशिक्षण विभाग)
- ए.जी.हायस्कूल दापोली (वाहन प्रशिक्षण विभाग)
- हायस्कुल, नाणीज
- फाटक हायस्कुल, रत्नागिरी
- जेएसडब्ल्यू पोर्ट लि. जयगड
वाहन चालक आणि वापरणाऱ्या व्यक्ती यांना असणारी मोटारीच्या तांत्रिक माहितीची गरज लक्ष्यात घेऊन 'मसुरकर्स अकॅडेमी' तर्फे चार तासांचा 'ओळख आपल्या गाडीची' हा प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येतो. तसेच ग्रामीण व गरीब कुटुंबातील मुलांसाठी अल्पकालीन 'वाहन दुरुस्ती वर्ग'ही चालविण्यात येतो.
नासिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 'बी.ए. मार्ग परिवहन' या शिक्षणक्रमाचे अभ्यासकेंद्रही 'मसुरकर्स अकॅडेमी' तर्फे चालविण्यात आले.
मोटार क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तीचा गौरव
मोटार व्यवसायातील कर्तबगार आणि सन्मान्य व्यक्तीच्या गुणगौरवाची पद्धतही 'मोटार जगत'ने सुरु केली. या उपक्रमाला 'आरसा' साप्ताहिकाचे संपादक श्री. बाळ भिसे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
या गौरवाचे सन्मानार्थी :
बाळ भिसे यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना बाळासाहेब पवार, सोबत डावीकडे बंधु बाष्टे, उजवीकडे प्राचार्य राजशेखर मलुष्टे |
- बंधु बाष्टे (मेकॅनिक)
- स्व. मोहनराव शिर्के (स्पेअर पार्ट डीलर)
- स्व. केशवराव जोशी (वाहतूक)
- शिवाजीराव शिर्के (पेट्रोल पंप चालक)
- जयूशेठ गांधी (पेट्रोल पंप चालक व वाहन डीलर)
- अ.र. मुकादम सर(आयटीआय प्रशिक्षक)
- स्व. नंदू केसरकर (मेकॅनिक)
- स्व. कापडी पेंटर (मेकॅनिक)
- चंदू पवार (मेकॅनिक)
- मनोहर (भाई) चव्हाण (वाहन चालक)
- स्व. बाळासाहेब पवार (रिक्षाचालक संघटक)
- श्री. गोगटे (रिक्षाचालक संघटक)
- दादा मानोरकर (मेकॅनिक)
- अविनाश भोसले (स्पेअर पार्ट डीलर)
No comments:
Post a Comment