चालक नसलेली गाडी चालते तरी कशी ?
चालकविरहित अर्थात स्वयंचलित मोटारीचं काम चालतं ते अत्यंत संवेदनशील सेन्सर
आणि नियंत्रण, चालन आणि वळविण्याच्या क्रिया करणाऱ्या संगणकीय सोफ्तवेअरच्या एकत्रित
कार्यामुळे. सध्या अशा प्रकारच्या अजिबात चालक नसलेल्या मोटारी प्रायोगिक अवस्थेत
असल्या तरी चालकाला बरीचशी मदत करून त्याचं काम सोपं अथवा मर्यादित बनविणाऱ्या
मोटारी अमेरिका आणि युरोपात आहेत.
या मोटारीमधली यंत्रणा गाडीच्या आतल्या आणि बाहेरच्या परिस्थितीचे नकाशे तयार
करते. त्यांचा अभ्यास करून पुढे कसं जायचं, कुठे आणि केव्हा वळायचं, कुठे आणि किती
झटकन थांबायचं या गोष्टींचा निर्णय सोफ्तवेअर घेतं. चित्र दाखविलेले सेन्सर आणि रडर
ही कामं करतात. अर्धस्वयंचलित वाहनांत चालक असतो आणि उपकरण सुचवीत असलेल्या
प्रसंगी धोका वाटला तर स्वतःचं डोकं वापरून गाडीवर नियंत्रण ठेवतो, पण पूर्णतः
स्वयंचलित वाहनाचं नियंत्रण संगणकीय व्यवस्थेकडून केलं जातं. अशा मोटारीत
स्टीअरिंग चक्रही नसतं. रस्ते वाहतुकीतील सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंचलित वाहनं हितकारक ठरतील,
कारण मद्यपान केलेल्या, बेदरकारपणे गाडी चालविणाऱ्या आणि नियम न पाळणाऱ्या चालकांसारखं
बेशिस्त वर्तन ती करणार नाहीत, त्यांच्या संगणकीय व्यवस्थेला जी माहिती पुरवण्यात
आलेली असेल तीनुसारच ती रस्त्यावर वावरतील. सावकाश चाललेल्या सायकलजवळून किती
वेगाने आणि किती अंतरावरून जायचं आणि वेगाने पळणाऱ्या मोटारसायकलच्या बाजूने किती
वेगाने आणि किती अंतरावरून जायचं यातला फरक ती अचूक ध्यानात घेतात. रस्त्यात
वाहतूक ठप्प झाली असेल तर उभी राहतात, आणि समोरचं वाहन किंचित पुढे सरकलं की आपणही
सरकतात. बराच वेळ गाड्या हलत नाहीत म्हणून चालकाने खाली
उतरून लघुशंकेला जाऊन येण्याचा किंवा तंबाखू मळून तोंडात टाकेपर्यंत पाठच्या वाहनचालकाने हॉर्न वाजवून ठणाणा करण्याचा प्रश्न येत नाही. शेजारच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे गाडी चालत आहे आणि चालक आपल्या सहकाऱ्याकडे तोंड करून कामाला लागला आहे असं दृश्य दिसण्याचा काळ दूर नाही. (१० एप्रिल २०१८)
उतरून लघुशंकेला जाऊन येण्याचा किंवा तंबाखू मळून तोंडात टाकेपर्यंत पाठच्या वाहनचालकाने हॉर्न वाजवून ठणाणा करण्याचा प्रश्न येत नाही. शेजारच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे गाडी चालत आहे आणि चालक आपल्या सहकाऱ्याकडे तोंड करून कामाला लागला आहे असं दृश्य दिसण्याचा काळ दूर नाही. (१० एप्रिल २०१८)
No comments:
Post a Comment