Monday, December 31, 2018

नवीन वर्षात नवीन काय?

'टाटा मोटार्स'ने आणलीय 'हॅरिअर' 
'डिस्कव्हर द हॅरिअर' हा कार्यक्रम १७ आणि १९ डिसेंबर २०१८ रोजी देशभर सादर झाला, त्या माध्यमातून  ही नवी मोटार कशी आहे ते ग्राहकांना पाहता  यावे अशी कल्पना होती.
'ऑप्टिमम मॉड्युलर एफिशिअंट ग्लोबल अडव्हानन्स्ड ' (ओमेगा ) आराखडा पद्धतीवर बेतलेली ही एसयूव्ही २०१८ च्या 'ऑटो एक्स्पो'मध्ये प्रथम प्रदर्शित झाली होती.

'वॅगन आर ' येणार नव्या रूपात
मारुती सुझुकी ची लोकप्रिय वॅगन आर जानेवारीच्या २३ तारखेला मोटरपेठेत येत आहे. एकूण उत्पादनांची २० लाख गाड्या एवढी प्रचंड विक्री झालेल्या भारतीय मोजक्या मोटारींपैकी ती एक. हार्टटेक या नव्या प्लॅटफॉर्मवर उभारलेली ही मोटार सुझुकीच्या इग्निस आणि स्विफ्टपेक्षा सरस ठरेल असं तज्ज्ञांना वाटतं . मात्र बरेच दिवस सात आसनी वॅगन आर येण्याची चर्चा होती, तशी ती असणार नाही. ती पाच आसनीच असेल.

सध्या विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे सरकारी धोरण आहे आणि ती काळाची गरजही आहे. सर्वच उत्पादकांप्रमाणे मारुतीचीही त्या दिशेने वाटचाल होत आहे. नवी विद्युत मोटार तयार करण्यासाठी ही कंपनी टोयोटाचे सहकार्य घेणार आहे.


'फोक्स वॅगन'ने बनवलंय बॅटरी बॅकअप 

विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या बॅटरी चार्जिंगला लागणार वेळ ही मोठी समस्या आहे. 'फोक्स वॅगन'ने विकसित केलंय झटपट बॅटरी चार्जिंगचं तंत्र. स्मार्ट फोनसाठी बॅकअप वापरला जातो ना, तसंच काहीसं असेल हे .

ट्रकही मागे नाहीत विजेवर चालण्यात 

विजेच्या मोटारींच्या शक्तीवर अवजड मालट्रक चालविण्याचे प्रयोग बरीच वर्षं सुरु आहेत. जगप्रसिद्ध लेलँड ट्रकचं उत्पादन करणाऱ्या 'डीएएफ ' कंपनीने आता विजेवर चालणाऱ्या मालमोटारींची मालिकाच विकसित केलीय. एलएफ इलेक्ट्रिक आणि सीएफ हायब्रीड वाहनांचा समावेश असणाऱ्या यामालिकेच्या चाचणीचा प्रारंभ नव्या वर्षात होत आहे, बाजारपेठेतील वातावरण अनुकूल होताच हे मालट्रकांनी विद्युत बसगाड्या ग्राहकांना उपलब्ध होतील.


(या आणि अशाच सविस्तर माहितीसाठी वाचा मोटार जगत - छापील अंक. आपली प्रत आजच बुक करा. पान छापीलअंक पहा )

No comments:

Post a Comment

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही...