विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण भारत सरकारने गेल्या काही वर्षांपासून अमलात आणले आहे. या वाहनांच्या बॅटऱ्यांचे चार्जिंग करण्यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशने सुरु करण्याचीही व्यापक योजना आहे. ही वाहने वापरण्यात चार्जिंगला लागणारा दीर्घ कालावधी, एका चार्जमध्ये कापायच्या अंतराची मर्यादा आणि बॅटऱ्यांची मोठी किंमत हे प्रमुख अडथळे आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील एका 'स्टार्ट अप ' कारखान्यात नवीन बॅटरी विकसित करण्यात आली आहे. प्रचलित लिथियम आयन बॅटऱ्यांपेक्षा त्या लवकर चार्ज होतील आणि त्यांची किमतीही कमी असेल असा दावा उत्पादकांनी केला आहे.
गेगाडाइन एनर्जी नावाच्या स्टार्ट अप उद्योगाचे सीईओ जुबिन व्हर्गीस यांनी ही माहिती दिली. प्रचलित लिथियम आयन (एलआय ) बॅटऱ्यांहून निराळे तंत्र यामध्ये वापरले आहे. एलआय बॅटऱ्यांमधील इलेक्ट्रोकेमिकल चार्जिंग आणि इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जिंग यांचे एकत्रीकरण करून त्या चार्ज केल्या जातात. परिणामी त्यांचे चार्जिंग जवळजवळ ५० पट जलद गतीने होते. या बॅटऱ्या वापरून चालणाऱ्या वाहनांची चाचणी यशस्वी झाली आहे, येत्या वर्षभरात पथदर्शी पातळीवर त्या विक्रीसाठी उपलब्ध होतील.
रीव्हर्स पार्किंग अलर्ट आता होणार सक्तीचे
कार, चार चाकींना जुलैपासून, २०२० पासून ट्रक, बसलाही अनिवार्य
वाहने पार्किंग अथवा अन्य कारणांसाठी मागे घेताना होणारे अपघात टाळण्यासाठी रीव्हर्स पार्किंग अलर्ट यंत्रणा सर्व प्रकारच्या वाहनांना बसविणे आता सक्तीचे होणार आहे. नुकत्याच जारी केलेल्या एका अध्यादेशाद्वारे रस्ते वाहतूक मंत्रालयाने हे स्पष्ट केले. कार आणि इतर चार चाकी गाडयांना जुलै २०१९पासून तर ट्रक आणि बसगाडयांना एप्रिल २०२० पासून ही यंत्रणा अनिवार्यकरण्यात येणार आहे. यामध्ये रीव्हर्स कॅमेरा बसविणेही आवश्यक ठरण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment