नवनवी मोटार वाहने, सुटे भाग, वाहनांतील आरामदायी अक्सेसरीज, वाहनांच्या दुरुस्तीची अद्ययावत उपकरणे, वंगणे आणि तेले यांची भरपूर दालने असणारे 'पुणे ऑटो एक्स्पो'चे नव्या वर्षातील प्रदर्शन जानेवारीच्या ११ तारखेस सुरु होत आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात गणेश कला इनडोअर स्टेडिअममध्ये ११ तेदरम्यान १४ जानेवारी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले असेल. त्याच दिवसांत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत ते व्यवसायिकांकरिता खुले असेल.
'स्मार्ट' शहरांकरिता पर्यावरणस्नेही वाहतूक ही मध्यवर्ती कल्पना (थीम) असणारे हे प्रदर्शन पुणे येथील 'एक्स्पो सेण्टर' तर्फे आयोजित करण्यात आले आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट, पूना ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन आणि स्कूटर मोटरसायकल रिपेअर्स रीसर्च असोसिएशन यांच्या सहकार्याने १२ व १३ तारखांना परिषद आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. १२ जानेवारी रोजी वेस्टर्न इंडिया गॅरेज ओनर्स अँड मेकॅनिक्स मीट तसेच मोटार क्षेत्रातील विक्रेते, वितरक आणि व्यापारी यांची सभा होईल, याबरोबरच 'सप्लाय चेन मॅनेजमेंट सेमिनार पार पडेल. यातील सहभागासाठी प्रत्येकी ५००/- रु. आणि तीन प्रतिनिधींकरिता १०००/- रु शुल्क आकारण्यात येईल.
१३ जानेवारी रोजी विद्युत वाहनांवर विशेष प्रकाश टाकत 'पर्यावरण स्नेही वाहने ' या विषयावर परिसंवाद घेण्यात येईल. यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकी २००/- रु. आणि तीन प्रतिनिधींकरिता ५००/- रु शुल्क आकारण्यात येईल.

No comments:
Post a Comment