एका आडवळणी गावात दरड कोसळून ढिगाऱ्याखाली माणसं अडकून पडलीत. गावाशेजारच्या नदीवरचा पूल गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. वाहनं अलीकडच्या तीरावर थांबवावी लागतात. त्या ठिकाणापासून आपत्तीचं स्थळ तीनचार किलोमीटरवर आणि तेही उताराच्या ऐन मध्यावर. एक जेसीबी कसाबसा दुर्घटनास्थळी पोहोचला, ढिगारा उपसण्याचं काम सुरु झालं, पण रुग्णवाहिकेपर्यंत माणसांना आणण्यात खूप वेळ खर्च होतोय, परिणामी एक दोन माणसं दगावलीत.
अशा प्रकारच्या बातम्या येण्याचं बंद होईल असं एक नवीन संशोधन झालंय. चाकं फिरून पुढे जाताजाता चक्क पावलं टाकून पायऱ्या चढू उतरू शकणारी मोटारगाडी ह्युंदाई कंपनीनं विकसित केलीय. पहा ना शेजारचं चित्र. कुठल्यातरी दुकानाच्या पायऱ्या उतरतेय वाटतं ही ! सांभाळा हो, दुकानदार मंडळी, नाहीतर चोखंदळ महिला साड्यांचे ढीग उपसायला लावतील आणि बराच वेळ झाला तरी मालकीण बाई का येत नाहीत म्हणून बाहेर पार्क केलेली मोटागाडी पायऱ्या चढून दुकानात शिरायची !!

(सविस्तर माहितीसाठी वाचा मोटार जगत - छापील अंक. आपली प्रत आजच बुक करा. पान छापीलअंक पहा )
Details of the Moter Jagat is very nice. Important information is available in Motor Jagat. Thanks to send me mail.
ReplyDelete