Thursday, January 17, 2019

विद्युत मोटारींच्या विक्रीत युरोपात बीएमडब्ल्यू प्रथम

पूर्णपणे विजेवर चालणाऱ्या आणि हायब्रीड इंजिने वापरलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मोटारींची युरोपात सर्वाधिक
विक्री करण्यात बीएमडब्ल्यू मोटार उत्पादक समूह यशस्वी झाला आहे. सन २०१८ मध्ये या समूहाने युरोपात ७५ हजार विद्युत व हायब्रीड मोटारी विकल्या. या कंपनीने बनवलेल्या या प्रकारच्या जगभरात विकल्या गेलेल्या मोटारींची एकूण संख्या १ लाख ४२ हजार एवढी आहे. विद्युत मोटारगाड्यांच्या युरोपातील विक्रीचा १६% तर जागतिक विक्रीचा ९% वाट 'बीएमडब्ल्यू' ने उचलला आहे. सन २०१७च्या तुलनेने २०१८ साली ३८% जास्त विद्युत मोटारी या समूहाने विकल्या.
चालू वर्षात हा समूह अनेक विद्युत मोटारी बाजारात आणत आहे. सध्याच्या वाहनांपेक्षा चार्जिंगच्या बाबतीत त्या अधिक स्वावलंबी असतील. बीएमडब्ल्यू ३ च्या मालिकेतील X 5  पीएचईव्ही तसेच मिनी इलेक्ट्रिकल व मिनी कंट्रीमन पीएचईव्ही त्यांत समावेश असेल. २०२५ पर्यंत विद्युत व हायब्रीड मोटारींची २५ मॉडेले ही कंपनी बाजारात आणणार आहे.
      

No comments:

Post a Comment

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही...