'नवी वॅगन आर ' विक्रीसाठी खुली !
गेल्या वर्षाच्या अखेरीपासून प्रतीक्षा असलेली 'नवी वॅगन आर ' आज देशभरात विक्रीसाठी खुली झाली. दोन इंजिने आणि सध्या तसेच स्वयंचलित गिअरबॉक्सच्या निवडीचा पर्याय घेऊन ती शोरूममध्ये दाखल झाली आहे. नवी दिल्लीत ४ लाख १९ हजार ते ५ लाख ६९ हजार रुपये शोरूम किंमतीत तिचे दोन विविध प्रकार ग्राहकांना उपलब्ध आहेत. मुंबईत ती ४.२८ ते या किमतीत मिळेल. आणखी वाचां नवीन
----आणि 'टाटा हॅरिअर 'सुद्धा !
२०१८ च्या 'ऑटो एक्स्पो 'मध्ये प्रथम प्रदर्शित झालेली 'टाटा हॅरिअर' सुद्धा याच दिवशी विक्रीसाठी खुली झाली. 'एसयूव्ही' वर्गातील टाटा हॅरिअर विकसित करताना उत्पादकांनी सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. प्रगत 'इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ईएसपी )' , चालकासह सहा एअर बॅगा आणि मुलांसाठी 'आयसोफिक्स ' तंत्राद्वारे सुरक्षित बनवलेलं खास बैठक या सुविधांसह ती ग्राहकांना उपलब्ध होईल. आणखी वाचां नवीन
No comments:
Post a Comment