Sunday, July 7, 2019

काय म्हणतंय बजेट ?

         

अर्थसंकल्पापाठोपाठ पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याचा एक जमाना होता. मग ते वर्षातून केव्हाही वाढू लागले. गेली काही वर्षं पेट्रोलचे भाव अधूनमधून कमीही होत होते. भारताच्या पहिल्या महिला वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पाने भारतीयांना अनेक बाबतीत दिलासा दिला असला तरी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आहे ती जवळजवळ सगळ्याच वस्तूंच्या भाववाढीचं कारण ठरणार आहे. वाहनधारकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. त्याचवेळी विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या खरेदीवर मोठी सवलत शिवाय तिच्या खरेदीसाठी काढण्याच्या कर्जावरचं व्याज करमुक्त केल्यानं त्या मोटारी घेणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण अशा गाड्या खरेदी करण्याचं प्रमाण सध्या तरी खूप कमी आहे. या विषयावर या सदरात यापूर्वी काही चर्चा झालीच आहे, आणखी काही करायची आहे ती नंतर करू.                              क्लिक - प्रकाशित लेख

               या वर्षासाठी सादर झालेल्या अर्थसंकल्पानुसार इंधनाबरोबरच रबराचे दर वाढतील. पुढे वाचा 

No comments:

Post a Comment

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही...