Monday, December 31, 2018
नवीन वर्षात नवीन काय?
'टाटा मोटार्स'ने आणलीय 'हॅरिअर'
'डिस्कव्हर द हॅरिअर' हा कार्यक्रम १७ आणि १९ डिसेंबर २०१८ रोजी देशभर सादर झाला, त्या माध्यमातून ही नवी मोटार कशी आहे ते ग्राहकांना पाहता यावे अशी कल्पना होती.
'ऑप्टिमम मॉड्युलर एफिशिअंट ग्लोबल अडव्हानन्स्ड ' (ओमेगा ) आराखडा पद्धतीवर बेतलेली ही एसयूव्ही २०१८ च्या 'ऑटो एक्स्पो'मध्ये प्रथम प्रदर्शित झाली होती.
'वॅगन आर ' येणार नव्या रूपात
मारुती सुझुकी ची लोकप्रिय वॅगन आर जानेवारीच्या २३ तारखेला मोटरपेठेत येत आहे. एकूण उत्पादनांची २० लाख गाड्या एवढी प्रचंड विक्री झालेल्या भारतीय मोजक्या मोटारींपैकी ती एक. हार्टटेक या नव्या प्लॅटफॉर्मवर उभारलेली ही मोटार सुझुकीच्या इग्निस आणि स्विफ्टपेक्षा सरस ठरेल असं तज्ज्ञांना वाटतं . मात्र बरेच दिवस सात आसनी वॅगन आर येण्याची चर्चा होती, तशी ती असणार नाही. ती पाच आसनीच असेल.
सध्या विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे सरकारी धोरण आहे आणि ती काळाची गरजही आहे. सर्वच उत्पादकांप्रमाणे मारुतीचीही त्या दिशेने वाटचाल होत आहे. नवी विद्युत मोटार तयार करण्यासाठी ही कंपनी टोयोटाचे सहकार्य घेणार आहे.

'फोक्स वॅगन'ने बनवलंय बॅटरी बॅकअप
विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या बॅटरी चार्जिंगला लागणार वेळ ही मोठी समस्या आहे. 'फोक्स वॅगन'ने विकसित केलंय झटपट बॅटरी चार्जिंगचं तंत्र. स्मार्ट फोनसाठी बॅकअप वापरला जातो ना, तसंच काहीसं असेल हे .
ट्रकही मागे नाहीत विजेवर चालण्यात
विजेच्या मोटारींच्या शक्तीवर अवजड मालट्रक चालविण्याचे प्रयोग बरीच वर्षं सुरु आहेत. जगप्रसिद्ध लेलँड ट्रकचं उत्पादन करणाऱ्या 'डीएएफ ' कंपनीने आता विजेवर चालणाऱ्या मालमोटारींची मालिकाच विकसित केलीय. एलएफ इलेक्ट्रिक आणि सीएफ हायब्रीड वाहनांचा समावेश असणाऱ्या यामालिकेच्या चाचणीचा प्रारंभ नव्या वर्षात होत आहे, बाजारपेठेतील वातावरण अनुकूल होताच हे मालट्रकांनी विद्युत बसगाड्या ग्राहकांना उपलब्ध होतील.
(या आणि अशाच सविस्तर माहितीसाठी वाचा मोटार जगत - छापील अंक. आपली प्रत आजच बुक करा. पान छापीलअंक पहा )

Saturday, December 29, 2018
वाहनचालकांमध्ये वाढतोय निष्काळजीपणा
मोटार वाहन हा दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे, मात्र
वाहन वापरताना आवश्यक ती काळजी घेण्याचा संस्कार सामान्य भारतीयांमध्ये रुजल्याचे
दिसत नाही. ‘फोर्ड’ या नामांकित मोटार उत्पादकांनी नुकत्याच केलेल्या एका पाहणीत
जवळजवळ ३७% वाहनचालक गाडी हाताळताना निरनिराळ्या बाबतीत निष्काळजीपणे वागतात असे आढळले
आहे.
सविस्तर वृत्त पान सुरक्षा
सविस्तर वृत्त पान सुरक्षा
Friday, December 28, 2018
११ जानेवारीपासून पुणे ऑटो एक्स्पो
नवनवी मोटार वाहने, सुटे भाग, वाहनांतील आरामदायी अक्सेसरीज, वाहनांच्या दुरुस्तीची अद्ययावत उपकरणे, वंगणे आणि तेले यांची भरपूर दालने असणारे 'पुणे ऑटो एक्स्पो'चे नव्या वर्षातील प्रदर्शन जानेवारीच्या ११ तारखेस सुरु होत आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात गणेश कला इनडोअर स्टेडिअममध्ये ११ तेदरम्यान १४ जानेवारी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले असेल. त्याच दिवसांत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत ते व्यवसायिकांकरिता खुले असेल.
'स्मार्ट' शहरांकरिता पर्यावरणस्नेही वाहतूक ही मध्यवर्ती कल्पना (थीम) असणारे हे प्रदर्शन पुणे येथील 'एक्स्पो सेण्टर' तर्फे आयोजित करण्यात आले आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट, पूना ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन आणि स्कूटर मोटरसायकल रिपेअर्स रीसर्च असोसिएशन यांच्या सहकार्याने १२ व १३ तारखांना परिषद आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. १२ जानेवारी रोजी वेस्टर्न इंडिया गॅरेज ओनर्स अँड मेकॅनिक्स मीट तसेच मोटार क्षेत्रातील विक्रेते, वितरक आणि व्यापारी यांची सभा होईल, याबरोबरच 'सप्लाय चेन मॅनेजमेंट सेमिनार पार पडेल. यातील सहभागासाठी प्रत्येकी ५००/- रु. आणि तीन प्रतिनिधींकरिता १०००/- रु शुल्क आकारण्यात येईल.
१३ जानेवारी रोजी विद्युत वाहनांवर विशेष प्रकाश टाकत 'पर्यावरण स्नेही वाहने ' या विषयावर परिसंवाद घेण्यात येईल. यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकी २००/- रु. आणि तीन प्रतिनिधींकरिता ५००/- रु शुल्क आकारण्यात येईल.

Wednesday, December 26, 2018
झटपट चार्ज होणाऱ्या बॅटऱ्या केल्यात विकसित
विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण भारत सरकारने गेल्या काही वर्षांपासून अमलात आणले आहे. या वाहनांच्या बॅटऱ्यांचे चार्जिंग करण्यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशने सुरु करण्याचीही व्यापक योजना आहे. ही वाहने वापरण्यात चार्जिंगला लागणारा दीर्घ कालावधी, एका चार्जमध्ये कापायच्या अंतराची मर्यादा आणि बॅटऱ्यांची मोठी किंमत हे प्रमुख अडथळे आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील एका 'स्टार्ट अप ' कारखान्यात नवीन बॅटरी विकसित करण्यात आली आहे. प्रचलित लिथियम आयन बॅटऱ्यांपेक्षा त्या लवकर चार्ज होतील आणि त्यांची किमतीही कमी असेल असा दावा उत्पादकांनी केला आहे.
गेगाडाइन एनर्जी नावाच्या स्टार्ट अप उद्योगाचे सीईओ जुबिन व्हर्गीस यांनी ही माहिती दिली. प्रचलित लिथियम आयन (एलआय ) बॅटऱ्यांहून निराळे तंत्र यामध्ये वापरले आहे. एलआय बॅटऱ्यांमधील इलेक्ट्रोकेमिकल चार्जिंग आणि इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जिंग यांचे एकत्रीकरण करून त्या चार्ज केल्या जातात. परिणामी त्यांचे चार्जिंग जवळजवळ ५० पट जलद गतीने होते. या बॅटऱ्या वापरून चालणाऱ्या वाहनांची चाचणी यशस्वी झाली आहे, येत्या वर्षभरात पथदर्शी पातळीवर त्या विक्रीसाठी उपलब्ध होतील.
रीव्हर्स पार्किंग अलर्ट आता होणार सक्तीचे
कार, चार चाकींना जुलैपासून, २०२० पासून ट्रक, बसलाही अनिवार्य

Sunday, December 23, 2018
अरे ! तारा नि हबशिवाय कसं फिरतंय हे चाक ?

फिनलंडमधल्या 'आरएमके' नावाच्या वाहन तंत्रज्ञांच्या उत्साही गटाने ही अभिनव मोटारसायकल तयार केलीय. 'आरएमके ई २' असं नाव तिला दिलंय . विद्युत मोटरद्वारे शक्तीपुरवठा होणाऱ्या या मोटारसायकलीच मागचा चाक चेन, हब, स्पोक यापासून मुक्त आहे.
ही 'हबलेस ' चाकाची कल्पना तीस वर्षांची जुनी आहे.
अधिक माहितीसाठी पहा -पान तंत्रज्ञान
बघा, बघा... वेगळीच दिसतेय ही मोटारबाइक !!
..

२०१८ या सरत्या वर्षात ज्या प्रायोगिक मोटारसायकली नव्याने सादर करण्यात आल्या त्यांत टीएमसी ड्युमॉं ही 'टॉप लिस्टेड' ठरली. विमानाचं इंजिन बसविलेल्या या मोटारसायकलीत 'हबलेस' चाकाचं तंत्र तर वापरलयच, पण बांधणी आणि रचनेच्या दृष्टीनेही ती सर्वस्वी 'नवीन ' आहे.
अधिक माहितीसाठी पहा -पान नवीन
Thursday, December 20, 2018
उद्याच्या मोटारीचा एक नमुना
ऑटोमोबाईल क्षेत्रात 'बॉश ' हे नाव खूप प्रसिद्ध. मोटारगाडीमधल्या बहुतेक अत्याधुनिक व्यवस्था, मग ते फ्युएल इंजेक्शन असो, एबीएस असो, नाहीतर गाडीमधले संगणकीय नियंत्रक असोत. 'बॉश 'ची उपस्थिती आढळणार नाही असं वाहन सापडणं कठीण. असं असताना अख्खी मोटागाडीच बनवावी असं 'बॉश 'ला नाही वाटलं तरच नवल ! अन बॉश बनवणार तर टी साधीसुधी मोटार कशी असेल ? ती असणार अतिप्रगत तंत्रज्ञानाने युक्त अशी संगणक युगाला साजेलशी ..........
आणखी वाचा - पान - नवीन
Sunday, December 16, 2018
नऊ अपघाती मृतांपैकी एक भारतीय
रस्ते अपघातांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले २०१० - २०२० हे दशक संपायला अवघी दोन वर्षे उरली आहेत. मात्र अपघातांची आणि विशेषतः अपघाती मृत्यूंची संख्या म्हणावी तशी घटलेली नाही. जगभरातील अपघातांची आकडेवारी पहिली तर जगात कोठे ना कोठे दर २३ सेकंदांनी एक मनुष्य रस्त्यावरील अपघातात मरण पावतो. असे मृत्यू येणाऱ्यांपैकी दर नऊ व्यक्तीमागे एक भारतीय असते. जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली आहे.
२०१० ते २०२० हे दशक 'Action For Road Safety' म्हणून कार्यान्वित करण्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे ठरविण्यात आले होते. या दहा वर्षांच्या काळात रस्त्यावरील अपघाती मृत्यूची संख्या निम्म्यावर आणणे हे प्रमुख उद्दिष्ट होते. परंतु ते साध्य करणे दूरच, मृतांच्या संख्येत वाढच होत असल्याचे दिसून आले आहे. २०१३ साली अपघाती मृतांची संख्या १२लाख ५० हजार होती, २०१६ साली ती एक लाखाने वाढून १३ लाख ५० हजार झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. गंभीर बाब अशी की या मृतांमध्ये ५ ते २९वर्षे वयोगटातील व्यक्तींचे (बालके आणि तरुण) प्रमाण अधिक आहे.त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे भारतातील रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या ३% एवढी कमी झालीआहे.
Subscribe to:
Posts (Atom)
Featured Post
चालकांनी दररोज म्हणावे असे ‘ मार्ग सुरक्षा श्लोक ’ वाहनांनी गजबजलेले रस्ते हे राष्ट्रीय प्रगतीचे एक चिन्ह. वाहनात बसून प्रवा...

-
आपल्या खाजगी मोटारीमध्ये आपण कसेही वागू शकतो अशी कोणाची समजूत असेल तर ती पूर्णपणे खरी मानता येणार नाही. स्वतःच्या मोटारीत बसून अथवा प्रवास क...
-
‘ स्क्रॅपिंग पॉलिसी ' आहे तरी काय ? जुनी वाहने मोडीत काढण्याचे धोरण केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्याबाबत ज्या बातम्या प्र...
-
महिंद्रा XUV 700 भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही...