Tuesday, January 29, 2019

भारतीय ट्रक उद्योगात क्रांतीचे पाऊल - ट्रकवर एएमटी गिअरबॉक्स

स्वयंचलित गिअरबॉक्स बसविलेल्या मोटारी आता आपल्याकडे चांगल्या रुळल्या  आहेत, मात्र आजवर हा विषय कर आणि एसयूव्हीपुरताच मर्यादित होत.आता 'आयशर' या नामवंत ट्रक उत्पादकांनी अर्ध स्वयंचलित (ऑटोमेटिक मॅन्युअल ट्रान्समिशन - एएमटी ) ट्रक भारतीय मोटरपेठेत आणला आहे.  भारतात तयार होणारा हा या प्रकारचा पहिला ट्रक आहे. 'आयशर प्रो ३०१६' असे याचे नाव असून त्याची क्षमता १६ टन आहे.

मध्यम व्यावसायिक वाहन प्रकारात 'महिंद्रा'ची नवी ट्रक मालिका 
तीसपेक्षा जास्त व्यावसायिकांनी १३ लाख किलोमीटर वापर करून समाधान व्यक्त केल्यानंतर 'महिंद्रा ट्रक अँड बस' ने नवी 'फ्युएरो' ट्रक मालिका मोटरपेठेत उतरवली आहे. 'महिंद्रा अँड महिंद्रा'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ' पवन गोएंका यांनी आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसह त्याचे शानदार मीडिया सादरीकरण केले.    आणखी वाचा ....नवीन     

Wednesday, January 23, 2019

प्रतीक्षा संपली !!!

                                                  'नवी  वॅगन आर ' विक्रीसाठी खुली !

              

गेल्या वर्षाच्या अखेरीपासून प्रतीक्षा असलेली 'नवी  वॅगन आर ' आज देशभरात विक्रीसाठी खुली झाली. दोन इंजिने आणि सध्या तसेच स्वयंचलित गिअरबॉक्सच्या निवडीचा पर्याय घेऊन ती शोरूममध्ये दाखल झाली आहे. नवी  दिल्लीत ४ लाख १९ हजार ते ५ लाख ६९ हजार रुपये शोरूम किंमतीत तिचे दोन विविध प्रकार ग्राहकांना उपलब्ध आहेत. मुंबईत ती ४.२८ ते    या किमतीत मिळेल.  आणखी वाचां नवीन 


 ----आणि 'टाटा हॅरिअर 'सुद्धा !



 २०१८ च्या 'ऑटो एक्स्पो 'मध्ये  प्रथम प्रदर्शित झालेली 'टाटा हॅरिअर' सुद्धा याच दिवशी विक्रीसाठी खुली झाली.  'एसयूव्ही' वर्गातील टाटा हॅरिअर विकसित करताना उत्पादकांनी सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. प्रगत 'इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ईएसपी )' , चालकासह सहा एअर बॅगा आणि मुलांसाठी 'आयसोफिक्स ' तंत्राद्वारे सुरक्षित बनवलेलं खास बैठक या सुविधांसह ती ग्राहकांना उपलब्ध होईल.  आणखी वाचां नवीन 

Tuesday, January 22, 2019

'जेएसडब्ल्यू पोर्ट 'तर्फे ट्रकचालकांना रस्ता सुरक्षाविषयक प्रशिक्षण

              दररोज सुमारे चारशे ट्रकांची ये-जा असणाऱ्या 'जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेड 'तर्फे ट्रकचालकांच्या रस्ता सुरक्षाविषयक प्रशिक्षणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. 'समजूतदार ट्रकचालक' हा स्लाईड शो दाखवून 'मोटार जगत'चे संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी उपस्थित ट्रकचालकांना सुरक्षित ड्रायव्हिंगविषयी प्रबोधनपर व्याख्यान दिले. जवळजवळ शंभर ट्रकचालकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
उदघाटनाच्या वेळी संबोधित करताना श्री. रवी,
सर्वश्री समीर गायकवाड, सुरेश चव्हाण, जोगळेकर. 
             दरवर्षी जानेवारी महिन्यात पाळल्या जाणाऱ्या राष्ट्रीय रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. कंपनीचे  उपाध्यक्ष आणि युनिट हेड कॅप्टन रवी चंदर श्रीराम यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. रस्ते वाहतुकीतील अपघातांच्या प्रमाणाचे गांभीर्य सांगून ' एका व्यक्तीचे प्राण वाचले  तरी हे प्रमाण कमी होईल.' असे म्हणत  प्रत्येक चालकाने त्यासाठी मनापासून प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.
            'मोटार जगत' आणि 'मसुरकर्स अकॅडमी ' यांच्या संयुक्त विद्यमाने  'समजूतदार ट्रकचालक' या  स्लाईड शोच्या माध्यमातून सादर केलेल्या ट्रकचालकांच्या प्रबोधन आणि प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात श्री मसुरकर यांनी चालकांशी संवाद साधत चालकाचे देशातील वाहतूक व्यवसायातील स्थान स्पष्ट केले. या व्यवसायाचे  अर्थकारण, अपघातांमध्ये असणारे मालट्रकांचे प्रमाण आणि महामार्ग तसेच अन्य रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण याची माहिती त्यांनी दिली. अपघातांची कारणे, ते टाळण्याचे उपाय आणि नवे तंत्रज्ञान याबद्दलही ते बोलले.
            'मोटार जगत'च्या 'समजूतदार ट्रकचालक' या विशेषांकाच्या प्रती यावेळी चालकांमध्ये वितरित करण्यात आल्या. रत्नागिरी महामार्ग पोलिसांच्या आवाहनावरून प्रकाशित करण्यात आलेल्या या विशेषांकाच्या निर्मितीसाठी सहकार्य केलेल्या आस्थापनांमध्ये 'जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड, जयगड ' या उद्योगाचा समावेश आहे. (अंकासाठी भेट द्या : पान छापील अंक ')   
            'जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेड 'च्या जनसंपर्क तसेच अन्य विभागांचे अधिकारी समीर गायकवाड, श्री. जोगळेकर इत्यादी त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते. मोटार जगत परिवाराचे ज्येष्ठ सहकारी सुरेश चव्हाण यांनी ट्रक चालकांच्या सुरक्षाविषयक प्रबोधनासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल 'जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेड ' आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Thursday, January 17, 2019

विद्युत मोटारींच्या विक्रीत युरोपात बीएमडब्ल्यू प्रथम

पूर्णपणे विजेवर चालणाऱ्या आणि हायब्रीड इंजिने वापरलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मोटारींची युरोपात सर्वाधिक
विक्री करण्यात बीएमडब्ल्यू मोटार उत्पादक समूह यशस्वी झाला आहे. सन २०१८ मध्ये या समूहाने युरोपात ७५ हजार विद्युत व हायब्रीड मोटारी विकल्या. या कंपनीने बनवलेल्या या प्रकारच्या जगभरात विकल्या गेलेल्या मोटारींची एकूण संख्या १ लाख ४२ हजार एवढी आहे. विद्युत मोटारगाड्यांच्या युरोपातील विक्रीचा १६% तर जागतिक विक्रीचा ९% वाट 'बीएमडब्ल्यू' ने उचलला आहे. सन २०१७च्या तुलनेने २०१८ साली ३८% जास्त विद्युत मोटारी या समूहाने विकल्या.
चालू वर्षात हा समूह अनेक विद्युत मोटारी बाजारात आणत आहे. सध्याच्या वाहनांपेक्षा चार्जिंगच्या बाबतीत त्या अधिक स्वावलंबी असतील. बीएमडब्ल्यू ३ च्या मालिकेतील X 5  पीएचईव्ही तसेच मिनी इलेक्ट्रिकल व मिनी कंट्रीमन पीएचईव्ही त्यांत समावेश असेल. २०२५ पर्यंत विद्युत व हायब्रीड मोटारींची २५ मॉडेले ही कंपनी बाजारात आणणार आहे.
      

Wednesday, January 9, 2019

चालणारी मोटार

              एका आडवळणी गावात दरड कोसळून ढिगाऱ्याखाली माणसं अडकून पडलीत. गावाशेजारच्या नदीवरचा पूल गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. वाहनं अलीकडच्या तीरावर थांबवावी लागतात. त्या ठिकाणापासून आपत्तीचं स्थळ तीनचार किलोमीटरवर आणि तेही उताराच्या ऐन मध्यावर. एक जेसीबी कसाबसा दुर्घटनास्थळी पोहोचला, ढिगारा उपसण्याचं काम सुरु झालं, पण रुग्णवाहिकेपर्यंत माणसांना आणण्यात खूप वेळ खर्च होतोय, परिणामी एक दोन माणसं दगावलीत.
              अशा प्रकारच्या बातम्या येण्याचं बंद होईल असं एक नवीन संशोधन झालंय. चाकं फिरून पुढे जाताजाता चक्क पावलं टाकून पायऱ्या चढू उतरू शकणारी मोटारगाडी ह्युंदाई कंपनीनं विकसित केलीय. पहा ना शेजारचं चित्र. कुठल्यातरी दुकानाच्या पायऱ्या उतरतेय वाटतं ही ! सांभाळा हो, दुकानदार  मंडळी,  नाहीतर चोखंदळ महिला साड्यांचे ढीग उपसायला लावतील आणि बराच वेळ झाला तरी मालकीण बाई का येत नाहीत म्हणून बाहेर पार्क केलेली मोटागाडी पायऱ्या चढून दुकानात शिरायची !!

(सविस्तर माहितीसाठी वाचा मोटार जगत - छापील अंक. आपली प्रत आजच बुक करा. पान छापीलअंक पहा )

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही'...