Tuesday, November 25, 2025

 'एन- टॉर्क 150'

149.7सीसी 'ओ 3 सी टेकतीन व्हॉल्व्ह इंजिन बसवलेली नवी 'एन- टॉर्क 150शोरूममध्ये दाखल झाली आहे.

प्रति मिनिट 5500 फेऱ्यांत14.2 न्यूटन मीटर टॉर्क आणि प्रति मिनिट 7000 फेऱ्यांत 13.2 PS (9.7 किलो वॅट) शक्तिनिर्मिती करणाऱ्या या गाडीचा वेगाचा काटा शून्यावरून 60 वर जाण्यास अवघी 6.3 सेकंद पुरतात.
जास्तीतजास्त वेग ताशी 104 किमी मिळतो.
पुढील चाकाला 220 मिमी डिस्क ब्रेक आहे.
भारतभर 1 लाख 19 हजार एवढ्या शोरूम किमतीला साधा प्रकार (स्टॅण्डर्ड व्हेरिएंट) उपलब्ध होईल. उच्च प्रकार (टॉप व्हेरिएंट) साठी आणखी दहा हजार रुपये मोजावे लागतील. यामध्ये TFT डिस्प्ले आहे.
एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोल पाऊस
धुके आणि आणीबाणीच्या प्रसंगी हजार्ड हेडलॅम्प या सुविधा
या वाहन गटातील पहिल्यांदा
 'क्रॅश डिटेक्शनसुविधा घेऊन आलेली गाडी हे तिचे वैशिष्ट्य. हँडलइंधन टाकीचे झाकण आणि सीटखालील डिकी या सर्वांना एकाच ठिकाणी चावी लावून उघडझाप करता येते.
ब्रेक लीव्हरच्या हँडलमधील स्क्रू मध्ये जुळणीची व्यवस्था आहे. सीटखाली चार्जिंग पोर्ट आहे.
पुढे टेलिस्कोपिक सस्पेंशन मागे शॉक अॅबसॉर्बर
 आणि मोठ्या आकाराचे टायर असल्याने स्कूटर वर्गातील गाडी असूनही चालविणाऱ्याला मोटारसायकलवर स्वार झाल्यासारखे वाटेल
या गाडीच्या हँडलबारवर इतर स्कूटरप्रमाणे कव्हर नाहीतसेच पुढील विंडशील्डची रचना मोटारसायकलच्या फेअरिंगसारखी आहे.
साध्या प्रकारात स्टील्थ सिल्व्हर आणि उच्च प्रकारात नायट्रो ग्रीन या विशेष रंगछटा तर रेसिंग रेड आणि टर्बो ब्ल्यू हे रंग दोन्ही प्रकारात मिळतील.
जमिनीपासून जास्त उंचीवर गाडीचा तळ  (रोड क्लिअरन्स्) असल्याने खराब रस्त्यांवर चालविण्यास योग्य ठरेल

 दुकाटी मल्टिस्ट्राडा V4

'नो कॉम्प्रोमाइज मोटारसायकल' असे जिचे वर्णन उत्पादकांनी केले आहे त्या  दुकाटी मल्टिस्ट्राडाची २०२५ ची सुधारित आवृत्ती  V4 नुकतीच मोटारपेठेत दाखल झाली आहे. १० हॉर्सपॉवर निर्माण करणारे ११५८ सीसी इंजिन 'मल्टिस्ट्राडा V4' साठी वापरले आहे.

            या गाडीच्या इंजिनाला चार सिलिंडर आहेत ते त्याच्या 'व्ही 4' या नांवातूनच स्पष्ट होते. एकमेकांशी ९० अंशांचा कोन करून बसवलेल्या सिलिंडरांच्या जोड्यांना सगळे मिळून १६ व्हॉल्व आहेत. 'डेस्मोड्रोमिक टायमिंग' हे या इंजिनाचे वैशिष्ट्य आहे. या पद्धतीत इनलेट आणि एक्झॉस्ट व्हॉल्व बंद करण्यासाठी स्प्रिंग वापरली जात नाही, तर कॅमचीच दुसरी बाजू व्हॉल्व बंद करण्याचे काम करते. यामुळे अतिवेगात पळणाऱ्या इंजिनातील व्हॉल्व स्प्रिंगा तुटण्याची शक्यता नाहीशी होते.

            दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या गाडीचा क्लच हायड्रोलिक ऑपरेटेड आहे, अन्य मोटारसायकलसारख्या यालाही अनेक क्लच प्लेटा आहेत.

            'दुकाटी मल्टिस्ट्राडा V4 RS'चा क्लच 'स्लिपर अॅक्शन ऑन ओव्हर रन' पद्धतीचा आहे. या तंत्रज्ञानामुळे विशेषतः जास्त वेगात गाडी असताना खालचा गिअर घेतल्यास इंजिन एकदम रेझ होऊन गाडीच्या गतीला एकदम खीळ बसल्यासारखे होण्याचे टळते. इंजिन आणि गाडी यांच्या भिन्न वेगांना एकमेकांशी जुळवून घेण्याचे हे तंत्रज्ञान आहे. सहा गतींच्या गिअर बॉक्सला 'क्विक शिफ्ट' व्यवस्था आहे. ही गाडी 'रायडिंग' आणि 'पॉवर' अशा दोन अवस्थांमध्ये (मोड) पळू शकते. वळणावर रस्त्यावरची पकड सैल होऊ नये यासाठी 'कॉर्नरिंग एबीएस', दुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, दुकाटी व्हीली कंट्रोल, व्हेईकल होल्ड कंट्रोल या यंत्रणांमुळे या गाडीवरचे रायडिंग सुरक्षित बनले आहे.

            'मल्टिस्ट्राडा V4 RS'ची चासी अॅल्युमिनियमची मोनोकॉक पद्धतीची असून मागील बाजूस टिटॅनियमसब फ्रेम आहे. 'ओहलिंस' बनावटीची सस्पेन्शन यंत्रणा मागे आणि पुढे वापरली आहे, तिला 'EC 2.0 इव्हेंट बेस्ड मोड'ची पूरक व्यवस्था आहे. अर्थातच अधिक लवचिक आणि अधिक स्थैर्य देणारे सस्पेन्शन स्वाराला जाणवेल. बैठकीची उंची ८४० मिमी असून ती ८६० मिमीपर्यंत वाढवून जुळवता येते.

            पुढे ३ x १९ इंच व्यासाची डिस्क आणि चार पिस्टन व दोन पॅडचा ब्रेक कॅलिपर तर मागे . x १७ इंच व्यासाची डिस्क आणि 'कॉर्नरिंग एबीएस' व्यवस्था आहे. मागील डिस्कचा व्यास अधिक असल्याने ब्रेकची परिणामकारकता वाढली आहे.

KTM Duke 160


KTM Duke 160 ही नवीन मोटारसायकल नुकतीच भारतीय मोटारपेठेत अवतरली. ही गाडी धरून 'केटीएम'च्या एकूण सहा मोटारसायकली शौकिनांना उपलब्ध झाल्या आहेत.

KTM Duke 160 चे शक्तिकेंद्र लिक्विड कुल्ड फोर स्ट्रोक सिंगल सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. सिंगल ओव्हरहेड कॅमशाफ्ट प्रकारचे हे 164.2 सीसी इंजिन प्रति मिनिट 7500 फेऱ्यांत15.5 न्यूटन मीटर टॉर्क आणि प्रति मिनिट 9500 फेऱ्यांत 19 PS शक्तिनिर्मिती करील.

इंजिन चालू करण्यासाठी किक नाही, फक्त सेल्फ स्टार्ट व्यवस्था आहे. 10 लीटर क्षमतेच्या पेट्रोल टाकीतून इंधन पुरवठा फ्युएल इंजेक्शन पद्धतीने होतो. एक लीटर पेट्रोलमध्ये 36.5 किलोमीटर चालते, अशी माहिती मिळाली आहे.

ही बीएस 6-2.0 निकषांची पूर्तता करणारी मोटारसायकल आहे. स्पोर्ट्स नेकेड बाईक प्रकारातील स्प्लिट ट्रेलिस चासिस फ्रेम, पुढेमागे डिस्क ब्रेक पुढे 320 मिमी व्यास आणि मागे 230 मिमी व्यासाच्या डिस्क असलेली ही मोटारसायकल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन घेऊन आली आहे.

शोरूम किंमत 1,84,998 रुपये आहे.

 

 

 


No comments:

Post a Comment

Featured Post

 ' एन- टॉर्क 150 ' 149.7सीसी   ' ओ 3 सी टेक '  तीन व्हॉल्व्ह इंजिन बसवलेली नवी   ' एन- टॉर्क 150 '  शोरूममध्ये दाखल ...